Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या तिजोरीत जुन अखरेपर्यत मालमत्ता करापोटी रु.100.30 कोटीचा भरणा

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना सन 2026-2027 या आर्थिक वर्षातील देयके पाठविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, हि देयके नागरीकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. दि.31 जुलै, 2026 पर्यत कराचा भरणा करणा-या नागरीकांना मालमत्ता करात (शासकीय कर वगळून) 5 टक्के सवलतीची सुविधा प्राप्त होणार आहे. तसेच, ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा केल्यास, 2 टक्के सवलत प्राप्त होणार आहे.
       महानगरपालिकेने याबाबत वेळोवळी केलेल्या आवाहनाला करदात्या नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जून-2026 अखेरपर्यत मालमत्ता करापोटी सुमारे रु.100.30कोटीचा भरणा महानगरपालिकेच्या तिजोरीत केला आहे. यामध्ये, एकूण 1,19,464 करदात्या नागरीकांनी रु.48.72 कोटी इतका ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा करुन या सुविधेचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षी माहे जुन-2025 पर्यत मालमत्ता करापोटी रु.67.88 कोटी इतका भरणा झाला होता.
करदात्या नागरीकांनी  केलेल्या सहकार्याबददल महानगर पालिका आभारी आहे. यापुढेही , दि.31 जुलै,2026 पर्यत 5 टक्के सवलतीची सुविधा असल्याने तसेच ऑनलाईन भरण्यावर 2 टक्के सुविधा महानगरपालिकेने जाहीर केल्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी  घरबसल्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा देयकावरील QR-Code च्या ऑनलाईन माध्यमातून आपल्या मालमत्ता कराचा भरणा करून विकासाला हातभार लावण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 


Post a Comment

0 Comments