Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू


      दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली पूर्वेतील कटाई-बदलापूर रोडवर भरधाव दुचाकीच्या धडकेत ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी रविवारी (७ जून) दुचाकी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू कालीचरण पाल (वय ६०) हे नेवाळी नाका येथून भाजीपाला खरेदी करून घरी परतत होते. १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास जत्रा हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना उल्हासनगर येथील भावेश जर्नादन कडू याने भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालवत त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात लालू पाल यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृताचे पुत्र प्रदीप लालू पाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments