Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये टेस्टी खवय्यांसाठी ‘पॉकेटझा’चे आकर्षण

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण, प्रतिनिधी 

कल्याण पश्चिमेतील आरतीनगरी परिसरात खाद्यप्रेमींसाठी एक वेगळी चव अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सतलज बिल्डिंगमधील पॉकेटझा या फूड आउटलेटमध्ये इटालियन क्लासिक पिझ्झापासून ते क्रिमी गार्लिक मशरूम, तंदुरी पनीर, चीजी फ्राईज, चीजी बॉल्स, विविध फ्लेवर्समधील मोजितो आणि चोको लावा केकपर्यंत अनेक स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे.

कल्याण पश्चिमेतील शॉप क्रमांक ६, सतलज बिल्डिंग, आरतीनगरी येथे असलेल्या पॉकेटझामध्ये पारंपरिक पिझ्झा तयार करताना केवळ मैदा आणि पाण्याच्या बेसपुरते मर्यादित न राहता मक्याचे पीठ, दर्जेदार सॉस, ऑलिव्हस आणि भरपूर चीजचा वापर करून खास इटालियन क्लासिक पिझ्झा तयार केला जातो. त्यामुळे पिझ्झाला वेगळी चव आणि आकर्षक पोत मिळत असल्याचे येथे येणाऱ्या ग्राहकांचे म्हणणे आहे.



या ठिकाणचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारा आयताकृती आकाराचा पिझ्झा. कल्याणमध्ये अशा प्रकारचा पिझ्झा उपलब्ध असलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी पॉकेटझाचा समावेश होत असल्याची माहिती आर्या ज्योती संदीप नाईक यांनी दिली.

पिझ्झासोबतच घरगुती साहित्याचा वापर करून तयार करण्यात येणारे चीजी फ्राईज, चीजी बॉल्स आणि चोको लावा केक हे पदार्थ ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. याशिवाय, ताजेतवाने करणाऱ्या विविध फ्लेवर्समधील मोजितो पेयांचाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ग्राहकांचा अनुभव अधिक आनंददायी करण्यासाठी पॉकेटझामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑर्डर तयार होण्याची प्रतीक्षा करताना ग्राहकांना पुस्तकांचे वाचन करता यावे, यासाठी छोटेखानी वाचन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी विविध बैठ्या खेळांचीदेखील सोय करण्यात आली आहे.

चव, दर्जा आणि वेगळेपणा यांचा संगम साधत पॉकेटझा हे ठिकाण अल्पावधीतच कल्याणमधील खाद्यप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

पत्ता : पॉकेटझा, शॉप नं. ६, सतलज बिल्डिंग, आरतीनगरी, कल्याण पश्चिम.




Post a Comment

0 Comments