Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दोन वर्षांपासून फरार असलेला अवैध बांधकाम व्यावसायिक सलमान डोलारे अटकेत

 

क्राईम ब्रँच युनिट-३ची कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे घरावर टाकला छापा

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

अवैध बांधकाम प्रकरणातील फरार आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक सलमान डोलारे याला कल्याण क्राईम ब्रँच युनिट-३ ने शनिवारी रात्री अटक केली. सलमान डोलारे हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता असून त्याच्याविरोधात अवैध बांधकामासह एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.
क्राईम ब्रँच युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांना सलमान डोलारे हा कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरातील खोटल मंझिल इमारतीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने कडेकोट बंदोबस्तात संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून त्याला ताब्यात घेत अटक केली. सलमान डोलारे याच्यावर आरक्षित भूखंडांवर अवैध बांधकाम केल्याचे गंभीर आरोप असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये १२ गुन्हे दाखल आहेत. 'युसूफ हाइट्स'सह इतर अवैध बांधकाम प्रकरणांमुळे तो चर्चेत होता. या प्रकरणात केडीएमसीच्या महत्त्वाच्या फाईली गायब झाल्याने तपास अधिकच गतीमान झाला आहे.
पोलीस आता सलमान डोलारे याची सखोल चौकशी करणार असून अवैध बांधकाम आणि इतर संबंधित प्रकरणांबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात क्राईम ब्रँचला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments