Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मानवतेच्या सेवाभावातून 115 निरंकारी भक्तांचे रक्तदान

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 संत निरंकारी मिशनच्या निःस्वार्थ मानवसेवेच्या प्रेरणादायी तत्त्वज्ञानातून संत निरंकारी सत्संग भवन, गोराई, बोरिवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उदात्त उपक्रमाला 115 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून जीवनरक्षणाच्या कार्यात आपले योगदान दिले.

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन  यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तसंकलनाची जबाबदारी संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले यांनी पार पाडली. स्थानिक सेक्टर संयोजक वामन सावंत यांच्या उपस्थितीत परमात्म्याच्या प्रार्थनेने शिबिराची सुरुवात झाली. याप्रसंगी मिशनचे स्थानिक मुखी व अनेक प्रबंधक तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.

    
या शिबिरास स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी तसेच आमदार संजय उपाध्याय यांनी सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या मानवतेसाठीच्या निःस्वार्थ सेवाकार्याचे कौतुक केले. हे शिबिर स्थानिक मुखी यांच्या देखरेखीखाली सेवादल सदस्य आणि एस.एन.सी.एफ. स्वयंसेवकांच्या सक्रिय सहकार्याने सुयोग्यरीत्या आयोजित करण्यात आले.


Post a Comment

0 Comments