Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नरेंद्र मोदींनी सोनारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा कॉंग्रेसचा आरोप

 

कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी घेतली सोनारांची भेट

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्ष सोनं खरेदी करणं टाळा असा आवाहन देशवासीयांना केला मोदींच्या या आवाहनानंतर कल्याणमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा कॉंग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सराफा व्यापाऱ्यांची भेट घेतली. ज्या सोनारांच्या पाठींब्याने नरेंद्र मोदी निवडून आले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसले असल्याचा आरोप यावेळी कुलकर्णी यांनी केला.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात पेट्रोल डिझेल जपून वापरा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा सोनं चांदी खरेदी करणं टाळा असं आवाहन केलं मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाचा काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी कडाडून विरोध केला. बारा वर्षाचे अपयश नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलं, मोदींनी केलेल्या विधानाचा सराफा व्यापाऱ्यांना फटका बसल्याचं कुलकर्णी यांनी म्हटले.

तर मोदी लोकांना बचत करण्याचे आवाहन करतात मात्र स्वतः हजारो गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढली. मुल जन्मल्यापासून ते मरणापर्यंत भारतात सोनं वापरलं जातं. महिलांची मोठी गुंतवणूक सोन्यात असते, कठीण काळात हेच सोनं कामाला येत असत. मात्र मोदींच्या या निर्णयामुळे सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना बेरोजगार करण्याचे काम मोदी यांनी केले असून याचा कॉंग्रेस निषेध असून कॉंग्रेस पक्ष सराफा व्यापाऱ्यांच्या सोबत असल्याचे कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments