ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची एक मोठी घटना घडली आहे. एका अज्ञात चोराने कुलूपबंद घरात घुसून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एम. अरविंद राजाराम पै (४९) हे कल्याण पश्चिम येथील रामबाग लेन क्रमांक ४, आशु अपार्टमेंटमध्ये राहतात आणि एका खासगी कंपनीत काम करतात. ७ मे रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी घराला कुलूप लावून मुंबईतील लोअर परेल येथील आपल्या कार्यालयात गेले.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास परत आले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. तपासात असे उघड झाले की, चोराने सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील दोन्ही धातूचे कपाट उघडले. लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि बॅगेत ठेवलेली १५,००० रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments