Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण तालुक्यात तेरा गावातून जाणार पुणे ट्रान्स मिशनची टॉवर लाईन

 

टॉवर लाईनला शेताकऱ्यांच्या हितासाठी प्रखर विरोध... आमदार किसन कथोरे
                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण तालुक्यातील हजारो  हेक्टर शेत जमीन विविध सरकारी प्रोजेक्ट साठी यापूर्वी संपादित केली आहे. तालुक्यातून सहा टॉवर लाईन यापूर्वी गेल्या आहेत. आता अदानी पॉवरची नवीन टॉवर लाईन कल्याण तालुक्यातून जातं आहे. पुणे येथून आलेली ही टॉवर लाईन तालुक्यातील, तेरा गावे व सहा पाड्यातून जातं आहे. या टॉवर लाईन साठी शेकडो हेक्टर जमीन भू संपादन केली जाणार आहे.
यापूर्वी महामार्ग, टॉवर लाईन व अन्य सरकारी प्रोजेक्टसाठी हजारो हेक्टर जमीन कवडीमोल भावाने उधोगपतीनी संपादित केली आहे. गेल व रिलायन्स पाईप लाईन साठी जमीन घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील पाच हजाराहून अधिक कुटुंब भूमिहीन झाली आहेत. त्यात नवीन अदानी पॉवरची हेवी क्षमतेची नवीन टॉवर लाईन साठी सर्व्हे करण्याचे काम सुरु केले आहे. या टॉवर लाईन मुळे शकडो शेतकरी भूमिहीन होणार आहेत, त्यामुळे सतप्त शेतकऱ्यांनी या टॉवर लाईन ला प्रखर विरोध केला आहे. या शेतकऱ्यांनी नुकताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी टॉवर लाईनला तीव्र विरोध करणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्याची दिशा भूल करुन जमिनी संपादित केल्या जातात हे चुकीचे आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना शब्द देत टॉवर लाईनला विरोध करा असा स्पष्ट इशारा दिला आहे. ही टॉवर लाईन पुणे येथून येत असून तीची क्षमता मोठी असल्याने त्यामुळे परिसरातील मोठी वृक्ष तोड होणार आहे. हे चित्र तालुक्याच्या विकासाला मारक आहे.  टॉवर लाईनच्या दरा बाबत ही मुद्दाम तफावत ठेऊन दलालांना हाताशी धरून नंतर शेतकऱ्यांची लूट केली जातं असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. 
कल्याण  तालुक्यातील गावाचे दर प्रती फूट  ₹३३८७/-  वावेघर व दानबाव या गावासाठी तर ₹३७६०/- रुपये दर उर्वरित अकरा गावातील शेतकऱ्यांसाठी आहे. ही तफावत का? असा प्रश्न शेतकरी तानाजी टेंबे यांनी केला आहे. ऊपविभागिय अधिकारयाचे पत्र घेऊन टॉवर लाईनचे अधिकारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
 कल्याण तालुक्यातुन १) वालकस २) बेहेरे ३) दानबाव ४) वावेघर ५) वासुन्दरी ६) नडगाव ७) फळेगाव ८) अडिवली ९) म्हसकळ १०) बापसई ११) नवगाव १२) चवरे १३) पोई या तेरा गावातून व अडवली, बेलकरपाडा, जांभूळ पाडा, आदिवासी वाडी मधून ही टॉवर लाईन जातं आहे. या टॉवर लाईन मुळे पोई वन विभागाच्या  हद्दीततील तीस हजार झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे  ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलाच माळरान होणार आहे.


Post a Comment

0 Comments