Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण रेल्वे यार्ड अत्याचार प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा


        पोलीस प्रशासनासह बैठक                    पिडीत कुटुंबियांची घेतली भेट

    पिडीत मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण                जबाबदारी शिवसेना घेणार
                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण रेल्वे यार्डातील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी कल्याणमध्ये येत रेल्वे पोलीस प्रशासनासोबत  बैठक करत झालेल्या घटनेचा आढावा घेतला. तसेच  पीडित कुटुंबियाची भेट देखील घेतली.

यावेळी त्यांनी बोलतांना कल्याण डोंबिवलीत अशा घटनेत पीडित मुलीला भेटण्याची हि १५ ते २० वी  मुलगी असून या प्रकरणात लवकरात लवकर पोलीस चार्टशीट दाखल करतील. या पिडीत मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार असून रेल्वेच्या आजू बाजूच्या रिकाम्या पडीक इमारती तोडण्यात याव्यात किंवा त्याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात याव्यात, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस यांचा समन्वय वाढविण्याच्या, रेल्वे यार्डात सर्च लाईट आणि सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

केंद्र व राज्यात सरकार वतीने राज्यात १४० पॉक्सो कोर्टचा प्रस्ताव मान्य झाला आहे. प्रत्यक्षात फक्त ३८ कोर्ट आले आहेत. उरलेली कोर्ट जो पर्यंत येत नाही तो पर्यंत या केसेसला विलंब होतो. लोकांची मागणी असते अशा घटनेत एनकाउंटर करा पण घटनेच्या चौकटीत असे एनकाउंटर करता येत नाहीत. अशा एनकाउंटर प्रकरणी अनेक पोलिस निलंबित झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी, शिवसेना आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना उपनेत्या विजया पोटे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments