Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला....

 

       मारहाण प्रकरणी तिघांना अटक

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानावर तीन जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांना दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये काही जण एका प्रवाशाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने डब्यात पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी तिघांना चौकशीसाठी फलाटावर उतरण्यास सांगितले. मात्र फलाट क्रमांक 4 वर उतरताच आरोपींनी जवान नरेंद्र यादव यांच्यावर हल्ला चढवला. तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली. 

 हा प्रकार पाहून फलाटावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि एकच गोंधळ उडाला.घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अब्दुल शेख, सलमान शेख आणि सरकार शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. या प्रकरणी कल्याण आरपीएफचे प्रभारी अधिकारी पी. आर. मीणा म्हणाले की, प्रवाशांमधील भांडण सोडवताना ही घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी तिघांना अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांवरच हल्ला झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.




Post a Comment

0 Comments