Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण स्टेशन परिसरातील सॅटिस प्रकल्प अंतिम टप्प्यात


महापौर हर्षाली चौधरी यांच्या उपस्थितीत रात्री २ वाजता गर्डर बसवण्याचे काम पूर्ण

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण-डोंबिवलीतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा कल्याण स्टेशन बाहेरील सॅटिस प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत मंगळवारी रात्री २ वाजता गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम यशस्वीरीत्या पार पडले.

या कामावेळी महापौर हर्षाली चौधरी  यांनी स्वतः उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला. यावेळी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता  परदेशी, नगरसेवक प्रतिक पेणकर तसेच कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आदी जण उपस्थित होते. सॅटिस प्रकल्पामुळे कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.

स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरशन लिमिटेड  अंतर्गत सुरू असलेल्या 'कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा" प्रकल्पाने आता आधनिकतेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पातील नियोजित "फ्लाय ओव्हर- A- सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौक़" - लांबी ११२५ मी. x रुंदी सरासरी (१८ ते ९ मी.) या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात आहे. या उ्डाणपुलाच्या Span AP14-ACP1 आणि ACPI-ACP2 या ठिकाणी बांधकामासाठी मलेशिया 'देशाच्या 'अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्ड फोर्ड काँक्रीट  या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, या  कामास आयआयटी मुंबई यांनी कामाचे स्ट्रक्चरल डिझाइनचा आधार उपलब्ध करून दिल्याने उड्डाणपुूलाचे काम अंतिम टप्यात आहे.


कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक येथे सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पुल  प्रस्तुत उड्डाणपुलाचे कामात निष्कासित करावा लागणार होता. परंतु स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त असल्याने, या एफओबी निष्कासित करणे योग्य नव्हते.  त्यामुळे कल्याण स्टेशन समोरील परिसरात  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळवारी मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग करण्यात आले. 



 कल्याण डोंबिवली महानगरपलिकेने  UHPFRC या जागतिक तंत्रज्ञानाचा  वापर केला असून, कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. UHPFRC हे पारंपारिक काँक्रीटपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबत आणि लवचिक असते. हे सिमेंट, सिलिका फ्युम, विशेष प्रकारचे स्टील फायबर्स आणि रसायनांचे मिश्रण करून तयार केले जाते. हे तंत्रज्ञान काँक्रीटला स्टीलसारखी मजबुती प्रदान करते. याची संकुचन शक्ती साध्या काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पटीने जास्त असते. हे काँक्रीट अत्यंत दाट असल्याने हवामानाचा किंवा प्रदूषणाचा यावर परिणाम होत नाही, ज्यामुळे पुलाचे आयुष्य १०० वषपिक्षा जास्त वाढते. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पुलाचे स्ट्रक्चर हलके परंतु अत्यंत भक्कम होते, ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अधिक सुरक्षा मिळते. याला तडे जाण्याचे प्रमाण नगण्य असल्याने भविष्यातील दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो. 

 या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे  शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस 'मिसिंग लिंक प्रकल्पात  UHPFRC या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments