Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काळू धरण क्षेत्रात पालकमंत्री यांच्या वक्तव्यावरून संतापाची लाट......धरणग्रस्तांचा एकत्र येत वक्तव्याचा निषेध..

 

                 ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड (रमेश घरत)

 ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील काळू नदीवर प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या कामाला गती दिली असून बाधित शेतकरी यांना विश्वासात घेतले असून त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी मार्गदर्शन करताना केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परिसरातील सर्व स्थानिक शेतकरी यांनी एकत्र येत धरणाला ठाम विरोध करण्याचा निर्धार काल मौजे जडई येथे केला.

 मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य शहरांना पाणीपुरवठा करण्याकरिता मुरबाड तालुक्यातील काळू व जोलंद या नद्यांच्या संगमावर काळू धरण बांधण्याचे शासनाचे नियोजन आहे व तशा सुचना प्रशासनाला देण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितल्याचे समजल्यानंतर ज्येष्ठ शेतकरी विलासकाका देशमुख व हरीभाऊ राऊत यांनी बाधित क्षेत्रातील शेतकरी यांनी निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी, शेतमजूर व रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

  यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र जन आंदोलनं मंचचे निमंत्रक प्रशांत सरखोत यांनी सांगितले की, मुंबई शहरातील कोणाही नागरिकांची कोणतीही मागणी नसताना हे धरण कोणाच्या हितासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी बांधले जात आहे हा प्रश्न आहे. केंद्रसरकारने धरणाला पूर्वपरवानगी देताना टाकलेल्या ३४ अटींची कोणतीही पूर्तता न करता धनदांडग्यांच्या फायद्यासाठी धरणाचा अट्टाहास सुरू आहे. मंत्री महोदय यांचं वक्तव्य हे वस्तुस्थितीच्या उलट असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा धरणाच्या भूसंपादन प्रस्तावाला ठाम विरोध असून तसे ठराव प्रत्येक ग्रामसभा यांनी एकमताने मंजूर केले असताना अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये करून शेतकऱ्यांना चिथावणी देण्याचे काम जर कुणी करत असेल तर त्याला आपण वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करू.

      यावेळी काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे सहाध्यक्ष पोपटराव देशमुख यांनी सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन आपल हक्काच जल, जंगल आणि जमीन वाचवण्याचे आवाहन केले व त्याकरिता शाई संघर्ष समिती खांद्याला खांदा लावून लढेल असे आश्वसित केले.

    

       या प्रसंगी परिसरातील आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी शेतमजूर यांनी उपस्थिती दर्शवली. आमचे शेती संबंधी अनेक दावे व पाणीयोजना यासारखे विषय प्रलंबित असताना धरणाचा अट्टाहास कशासाठी तसेच पालकमंत्री यांचं वक्तव्य हे आमच्या भावना दुखावणारे असून शेतकरी यांची चेष्टा करणारे असल्याने या खोट्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत असे संतोष राऊत म्हणाले 

     यावेळी ज्येष्ठ शेतकरी शशिकांत देशमुख, शरद देशमुख,काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांचे उपाध्यक्ष सय्यद शेख, कार्याध्यक्ष गणेश देशमुख, कोशाध्यक्ष संताजी देशमुख, सहसचिव कैलास निमसे, सहकोषाध्यक्ष रोशन चौधरी, रघुतात्या देशमुख,जयवंत देशमुख, संभाजी गोडांबे, दशरथतात्या देशमुख , अनंता देशमुख, रामभाऊ देशमुख इत्यादी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments