ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिक्षणाची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या डोंबिवली शहराने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि बुद्धिमत्तेची ताकद सिद्ध केली आहे. जान्हवी कुलकर्णी हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षा २०२६ मध्ये तब्बल १०० टक्के गुण मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले असून, हा क्षण संपूर्ण डोंबिवलीसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे.
आई वरदा कुलकर्णी आणि वडील वरुण कुलकर्णी यांच्या संस्कारांची, मेहनतीची आणि मार्गदर्शनाची ही उज्ज्वल फलश्रुती असून, जान्हवीने आपल्या अभ्यासू वृत्ती, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे अभूतपूर्व यश मिळवले आहे.
या दैदिप्यमान यशामागे विद्यार्थिनीची मेहनत जितकी महत्त्वाची आहे, तितकेच मोलाचे योगदान आहे ते म्हणजे आयइएस चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे उत्कृष्ट शैक्षणिक संस्कार, दूरदृष्टी असलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता घडवणारे समर्पित शिक्षकवृंद.
डोंबिवलीच्या शैक्षणिक परंपरेला नवा सुवर्ण अध्याय जोडणाऱ्या जान्हवीचा गौरव कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सत्कार करून केला. आपल्या शहरातील मुलगी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहे, ही प्रत्येक डोंबिवलीकरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे डोंबिवलीचे नाव पुन्हा एकदा राज्यभर गाजले असून, असंख्य विद्यार्थ्यांसाठी जान्हवी एक प्रेरणादायी आदर्श बनली असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश मोरे यांनी दिली. तर उपस्थित मान्यवरांनी जान्हवीच्या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
.jpg)



Post a Comment
0 Comments