Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन कार्यक्रम केडीएमसीत उत्साहात साजरा

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन कार्यक्रम कल्याण डोंबिवली महापालिकेत उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय गीत गायनानंतर महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी महापालिका मुख्यालयात ध्वजवंदन केले. तद्नंतर राष्ट्रगीत गायन झाल्यावर राज्यगीताची ध्वनिफीत वाजविण्यात आली. यावेळी महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

यावेळी शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, पालिका सदस्या विजया पोटे, महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त वंदना गुळवे, बाळासाहेब चव्हाण, कांचन गायकवाड, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत,  मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, शैलेश कुलकर्णी, जितेंद्र शिंदे, संदीप तांबे, राजू राठोड, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच महापालिकेचा इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

 महापालिकेच्या डोंबिवली विभागात उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, कॅप्टन विनय कुमार सचान यांचे पिता राजा बेटा सचान, उपायुक्त प्रसाद बोरकर,  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपा शुक्ल, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, प्रसाद सखदेव, सहा. आयुक्त प्रसाद ठाकूर, राजेश सावंत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.

 त्याचप्रमाणे दत्तनगर, डोंबिवली (पूर्व )येथील १५० फुटी ध्वजाचे ध्वजवंदन महापालिकेचे सभागृह नेते वरूण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) जगदीश कोरे, पालिका सदस्या दिपाली पाटील, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे व इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments