Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेतकरी नेते राजू शेट्टी यांची संघर्षात उडी व आंदोलनाची हाक


              ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड (रमेश घरत) 

 ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मुंबईसह ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सारख्या वाढत्या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या हेतुने एमएमआरडीए                   ( MMRDA) यांच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा संघर्ष सद्या पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आज" काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था, काळू परिसर यांच्या तळेगांव येथील कार्यालयाला  शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली व प्रस्तावित काळू व शाई धरण बाधित क्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींशी यापुढील आंदोलनाची दिशा तसेच धरणसंबंधी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचाली व त्यामुळे निर्माण झालेले शेतकरी प्रश्न या विषयी चर्चा केली.  सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात सर्वच काळू व शाई धरण परिसरातील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरण्याची तयारी करण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. तसेच आगामी काळात प्रत्येक प्रसंगी धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून, संघर्षात साथ देण्याचे  आश्वासन राजू शेट्टी यांनी दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी फनाडे यांनी सांगितले.

       यावेळी राजू शेट्टी यांनी धरण क्षेत्रातील जनसामान्यांच्या भावना  उपस्थित शेतकरी प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या . तसेच पुढील पंधरवड्यात श्रमिक मुक्ती संघटना आणि काळू व शाई धरणाच्या कृती समिती यांनी  संयुक्तरित्या निश्चित केलेल्या दिवशी उपविभागीय अधिकारी कल्याण तथा भूसंपादन अधिकारी काळू प्रकल्प यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचां प्रशासनाला कडक इशारा दिला .

              याप्रसंगी काळू संघर्ष समितीचे  पोपटराव देशमुख, हरिभाऊ राऊत व गणेश फनाडे,ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विलासकाका देशमुख, शाई  संघर्ष समितीचे उमेश वारघडे व हिरामण भोईर, ज्येष्ठ शेतकरी शिवाजीअण्णा देशमुख, शशी देशमुख,सुभाष चौधरी,चंद्रकांतदादा देशमुख, रघुतात्या देशमुख,अरुणबंधु चौधरी, रंगनाथ देशमुख,विश्वनाथभाऊ देशमुख, रामभाऊ देशमुख,आदिवासी प्रतिनिधी रमेश खाकर, भाऊ पारधी, पांडू खडके,माहिती अधिकार संघाचे जिल्हाप्रमुख संतोष राऊत, मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे सरचिटणीस संभाजी गोडांबे, उपसरपंच भावेश पठारे,युवा शेतकरी तानाजीमामा देशमुख,तुषार देशमुख, बाळा आगिवले व काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments