Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयात रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते ध्वजवंदन

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते पार पडला. महाराष्ट्र दिनानिमित्त मान्यवरांचे हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पाणपोईचे उद्घाटन देखील पार पडले.
या ठिकाणी अश्वमेध प्रतिष्ठान, इंटॅक ठाणे चॅप्टर व स्थापत्य संवाद यांचे माध्यमातून 'ऐतिहासिक कल्याण' हे विविध ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.


कल्याण तालुक्याचा प्राचीन वारसा, लोकसंस्कृती इ. बाबत संवर्धन व जनजागृती व्हावी हा विविध ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन करण्याचा हेतू या निमित्ताने सफल झाल्याचा आनंद प्रतिष्ठानचे अविनाश हरड व अॅड. दिव्या ठाकुर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, जीवनदीप शैक्षणिक संस्था गोवेली येथील एन.सी.सी.चे विद्यार्थी, विविध प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी इ. मान्यवर उपस्थित होते. महसूल व पोलीस विभागाच्या कार्यालयाची रविंद्र चव्हाण यांनी पाहणी करुन येथील स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व सेवांबाबत समाधान व्यक्त करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments