Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नागरिकांची फसवणूक करणारे बिल्डर अद्यापही मोकाट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कारवाई करण्याची मागणी


                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली पूर्वेतील खोणी परिसरात साई माउली डेव्हलपर यांनी सुमारे २५० रूम धारकांची तब्बल ३ कोटी रुपयांची फसवणूक केली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन सुद्धा फसवणूक करणारे हे बिल्डर आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. त्यामुळे या प्रकरणी कडक कारवाई करत तातडीने या बिल्डरांना अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शालिनी वाघ यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत त्यांनी कल्याण येथे  पूर्व प्रादेशिक अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना निवेदन दिले आहे.

       काटई बदलापूर रोडवर खोणी ग्रामपंचायत हद्दीत धामटान येथे एकविरा धाब्यामागे सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मेहनतीचे पैसे रूम बुक करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक मनोज धुमाळ, सचिन सुर्वे, समीर कदम, निखील कडलग, एडव्होकेट रविंद्र यादव  व इतर साथीदारांकडे तब्बल ३ करोड रुपये दिले. रूम देतो असे सांगून या नागरिकांकडून संबंधितांनी पैसे घेतले असून प्रत्यक्षात रूम न देता बिल्डरांनी पळ काढला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली असून याप्रकरणी या नागरिकांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन कित्येक दिवस उलटले तरी फसवणूक करणारे आरोपी मोकाट असून नागरिक मात्र हताश झाले आहेत.

       याप्रकरणाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने दखल घेऊन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. या फसवणूक झालेल्या नागरिकांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते आणि जिल्हाध्यक्षा शालिनी वाघ यांच्या नेत्तृत्वाखाली अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या कार्यालयावर धडक देत सबंधित बिल्डरांवर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यातील आरोपींचा राजकीय पक्षाशी सबंध असल्याने त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप रिपाइंन केला असून या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 


Post a Comment

0 Comments