Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

निरंजन निरागस । निरामय निरलस। निष्कलंक निर्भय । निरंतर । -सुधीर देवराम घागस..अध्यक्ष, शिक्षणक्रांती संघटना.

 

           सन २०१२ पासून कोकण विभागातील पदवीधरांचे महाराष्ट्र विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे सतत कार्यमग्न नेतृत्व म्हणजे आमदार निरंजन डावखरे. पदवीधर मतदार संघ म्हणजे बुध्दीजीवींचा समूह, त्यातही कोकण विभाग म्हणजे दमणगंगा ते तेरेखोल खाडी असा ७२० किलोमीटर (काही अद्ययावत माहितीनुसार ८७७ किलोमीटर) लांबीचा विस्तीर्ण प्रांत. एवढ्या विस्तीर्ण प्रदेशातील तमाम पदवीधरांशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्यांचे ‘निराकरण’ करायचे म्हणजे 'अलख निरंजन'च व्हावे लागते. आपले निजरूप निरामय, निस्पृह, निष्कलंक, निरुपद्रवी, निराधारांना आधार देणारे, निरागस, निर्भीड व निरंतर निरलस असल्याशिवाय बुध्दीजीवी घटकांचे सातत्याने प्रतिनिधित्व करणे केवळ अशक्यच!

           भेटणारी व्यक्ती लहान असो की थोर, तीस भेटतांना निरंजनजींचा भाव सदैव विनम्रतेचाच असतो. समस्या लक्षपूर्वक ऐकून ती सोडवण्यासाठी तात्काळ 'अॅक्शन' घेणे हा त्यांचा स्वभाव, सतत कार्यमग्न राहणे हा त्यांचा अलंकार, जागृकता व लोकाभिमुकता ही त्यांची वृत्ती तर सर्वांचा विकास हाच त्यांचा ध्यास त्यांच्या जीवनशैलीतून पाहावयास मिळतो. अढळ पाठिंबा, नितांत प्रेम, विश्वासार्हता, आयुष्यातील सर्व आव्हानांमध्ये सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही ते पाळत आलेली वचने आहेत. 

            राज्याचे नेतृत्व मा. देवेन्द्र फडणवीस (देवाभाऊ) ते देशाचे नेतृत्व मा. नरेन्द्र मोदी यांच्या सरकारने आखलेल्या सर्व लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणीकडे निरंजनजींचा कटाक्ष असतो. विकासाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक स्तरावरही नियोजन व आयोजन असते. त्यांच्या या समर्पित भावनेची दखल घेऊनच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविन्द्र चव्हाण (रविदादा) यांनी त्यांच्या खांद्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली. पद ग्रहणानंतर सत्कार सोहळ्यांमध्ये गुंतून न राहता पक्षवाढीसाठी ते राज्यभर फिरून कंबर कसीत आहेत.

           पूजनीय लोकनेते स्व. वसंतराव डावखरे यांचा समृद्ध राजकीय वारसा व आई स्व. शकुंतला यांचे उत्तम संस्कार यामुळे ते सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पाडीत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निलिमाताई यांची भक्कम साथ व अनमोल योगदान साहेबांच्या वाटचालीस मोलाची प्रेरणा देत आहे. या उभयतांसह दोन्ही सुपुत्र म्हणजे एक आदर्श भारतीय कुटुंब आहे. ईश्वराच्या कृपेने व जनतेच्या दुवांमुळे या सर्वांना निरोगी, आनंदी, यशस्वी व उदंड आयुष्य लाभणारच आहे.

           कष्ट व सेवा तर अनेकजण करतात पण त्यात आनंद मानणारे कमी असतात, यशस्वी तर खूप लोक होतात परंतु इतरांनाही आनंद वाटेल असे यश खूप कमी लोक मिळवतात, माणसे तर खूप जोडली जातात आयुष्यात मात्र जीवाला जीव देणारी फार कमी लोकांच्या वाट्याला येतात. निरंजन डावखरे साहेबांचे जीवन खऱ्या अर्थाने असेच दुर्मिळ असणारे आहे. ते जे काम हाती घेतात ते तडीस नेतात, त्यांच्या मार्गक्रमणात क्वचितच अडथळे येतात. कारण ते अजातशत्रू असणारे खरे लोकप्रिय नेते आहेत. समुद्राच्या जवळ गेल्याशिवाय त्याची विशालता व पाण्यात उतरल्याशिवाय त्याची सखोलता कळू शकत नाही. तद्वतच निरंजन साहेबांचे व्यक्तिमत्व दे समुद्रासारखेच आहे. त्यांची भावी वाटचाल ही अशी असावी- 


रोशन हुआ चिराग, अंधेरे सीमट गये

झुलमत के पर उजालोंकी कैंची से कट गये

इस दर्जा तेज गाम था में अपनी राह मे 

रस्ते के लोग खुद ही किनारो पे हट गये।

-शुभम भवतु ॥





Post a Comment

0 Comments