Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्त्री संवेदना

    

स्वतंत्र आम्ही,स्वयंसिद्धा आम्ही,

तरीही का थट्टेचा विषय आम्ही,

रणरागिणी आम्ही,चंडिका आम्ही,

तरीही का असुरक्षित आम्ही,

बलात्कारीचे का सावज आम्ही,

आत्मनिर्भर आम्ही,निर्धारी आम्ही,

तरीही का निराधार आम्ही,

धोरणी आम्ही, कार्यक्षम आम्ही,

तरीही का अबला आम्ही,

वात्सल्य आम्ही, करुणा आम्ही,

सण आम्ही,उत्सव आम्ही,

तरीही एकच दिवस का महिला दिनाचा,

रोजच होऊ दे जागर स्त्री - शक्तीचा,

वाण ते हळदीकुंकवाचे,

वसा तो सावित्रीचा,

स्त्रीत्वाची जाणीव मनी,

एकी पोटी दुसरी जन्म घेई,

तरीही का असे ती पोरकी,

भावनाशील आम्ही,एकमेकींच्या सखी आम्ही,

तरीही का ' मनमोकळ्या संवादाची ' अढी मनी,

तोडून बंधन कडवटपणाचे,जोडूया एक नवे नाते,

माझी वेदना,तुझी संवेदना व्हावी,

मी एक स्त्री, तुझ्यातील स्त्रीत्वाचा सन्मान करी.

                           

                    दिव्या पवार 

( चेंबूर कर्नाटक हायस्कूल, सहाय्यक शिक्षिका )


Post a Comment

0 Comments