ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थचा जयघोष करीत कल्याण डोंबिवली शहर परिसरात स्वामींचा प्रकट दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कल्याण पारनाका येथील केंद्रात बालविकास कार्यशाळ, हितगुज, पारायण आदीसह सामुहिक स्वामीचरित्र सारार्मृताचे पठण करून स्वामींचा अभिषेक करण्यात आला. तसेच पारनाका केंद्राला तीन वर्ष पूर्ण झाल्याने तिसरा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला.
कल्याण शहरातील बिर्ला कॉलेज रोड लगत असलेल्या श्री स्वामी समर्थ चौकातील केंद्र, भवानी नगर येथील मठात परिसरातील हजारो नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अध्यक्षा,आणि भाजप कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ.भारतीय रोहिदास गायकर आणि रोहिदास गायकर यांच्या माध्यमातून असलेल्या हजारो भाविकांच्यासाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.सदर केंद्रात हजारो भाविकांची गर्दी ओसंडून वाहतांना दिसून आली.
खडकपाडा, रामबाग, काळातलाव, गोदरेज हिल, कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी, गणेश नगर आदी अनेक ठिकाणी स्वामींच्या मठात आणि केंद्रात भक्तांनी स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. प्रामुख्याने कल्याण पश्चिमेतील फॉरेस्ट कॉलनी मधील सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वामी समर्थ चौकातील केंद्रात सामुहिक पारायण आणि सामुहिक स्वमिचारीत्र सरार्मृत चे पठण करण्यात आले.
पारनाका येथील केंद्रात सेवेकरी स्वाती पाचघरे यांनी बालसंस्कार वर्ग आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पठण, श्री गुरुचरित्र पारायण, श्री नवनाथ पारायण अशा विविध अध्यात्मिक सेवांची माहिती भक्तांनी दिली. २०२३ मध्ये स्वामी महाराजांच्या प्रकटदिनी पारनाका सेवा केंद्राची स्थापना झाली होती. गेल्या तीन वर्षात या केंद्राच्या माध्यमातून २० टक्के अध्यात्म व ८० टक्के समाज कार्य या दिंडोरी प्रणित मार्गाच्या उक्तीनुसार पारनाका सेवा केंद्र येथे आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले.
वर्षभरामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे, भव्य रक्तदान शिबिरे, योग शिबिरे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आदिवासी पाड्यांवर व कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती सेवेकरी स्वाती पाचघरे व संज्योत पाचघरे यांनी दिली. यावर्षी केंद्रात सूर्या रुगानालायाच्या माध्यामतून २१ आणि २२ मार्च रोजी मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन स्वाती पाचघरे यांनी केले आहे.
.jpg)






Post a Comment
0 Comments