घरोघरी जगभरी श्री शिवरायांची महाआरतीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मठ आनंदनगर ठाणे येथे
गुरुमाऊली श्री विकासदादा पाटील यांच्या आशिर्वादाने
तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या साहाय्याने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणी डोळे तपासणी अल्प दरात चष्मे हे शिबीर भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंद मठ येथे श्री.स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, तर्फे समाजातील गरजू आणि वृद्ध व्यक्तींना मोतीबिंदू सारख्या नेत्र रोगांच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.
पनवेल मधील डॉ. सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या सहकार्याने शिवभक्त असलेले श्री.कुलदीप पोखरकर आणि त्यांचे सहकारी श्री.सरोज ठाकरे यांच्या प्रयत्नाने या शिबिराचे आयोजन करून गरजू नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्प दरात चश्मे वाटप केले गेले.
रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आनंदनगर मठ, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे गरजू नागरिकांचे ,तसेच वृद्ध लोकांना एकाच ठिकाणी डोळे तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड च्या अध्यक्षा सौ. विभावरी मनी ताई यांजकडून श्री स्वामी समर्थ मठात येणाऱ्या भक्त मंडळींना वैद्यकीय मार्गदर्शन केले. ह्या शिबिरात असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सदर शिबीर आयोजित करणाऱ्यांचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले.
.jpg)




Post a Comment
0 Comments