ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला सहा तासात अटक केल्याची कामगिरी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी केली आहे.
कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण पूर्वेतील चक्कीनाका रेजेन्सी पार्क येथे पार्क केलेल्या चारचाकी गाडीची कोणीतरी अज्ञात इसमाने काच फोडुन गाडीत ठेवलेला काळया रंगाचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरी केला होता. तसेच आजुबाजुच्या इतर पाच गाडयांच्या काचा फोडुन नुकसान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप भालेराव व त्यांचे पथक करीत असताना गुन्हयाच्या घटनास्थळी मिळुन आलेले सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून आरोपी सुजल वाघचौरे, वय २१ वर्षे, रा. चक्कीनाका, कल्याण पुर्व. याला गुन्हा घडल्यापासुन अवघ्या सहा तासात अटक केली. आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेला १८ हजार रू. किमंतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेला आहे. 
हि कारवाई पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे व सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व पोनि गुन्हे गणेश न्हायदे यांच्या सुचनेप्रमाणे सहा. पो निरी संदिप भालेराव, पोहवा विशाल वाघ, दत्तु जाधव, गोरखनाथ घुगे, रोहीत बुधवंत, विलास जरग, पोना दिलीप कोती यांच्या पथकाने केलेली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments