भाजपाच्या मंदा पाटील आणि ज्योती पाटील बिनविरोध विजयी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पॅनल क्रमांक 27 अ मधून मंदा पाटील आणि पॅनल क्रमांक 24 ब मधून ज्योती पाटील असे या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या महिला उमेदवारांचे नाव आहे. मंदा पाटील आणि ज्योती पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे.
तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) 4 उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने 9 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे.
भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील 8 महापालिकेत एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच 12 उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळवलं आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments