Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेश द्वारा बाहेर कचराच्या ढिगाराला मोठी आग


               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वारा बाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागल्याची घटना संध्याकाळी घडली. याठिकाणी अनेक दिवस कचरा साचला आहे. एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळील  मेट्रोचे समोरच काम चालू असल्यामुळे  बॅरिकेट लावण्यात आले असल्या कारणामुळे कचऱ्याची गाडी तिथे येत नसून तसंच कचरा उचलल्या जात नसल्यामुळे अनेक दिवसांपासून कचरा साठला असल्याने तिथे आज आग लागली आहे. 



दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठी रवाना झाली, मात्र कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा फटका या गाडीला देखील बसल्याने अग्निशमन दलाची गाडी उशिरा दाखल झाली. अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली.  सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

Post a Comment

0 Comments