ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेखा चौधरी,आसावरी नवरे आणि रंजना पेणकर तर पनवेलमध्ये नितीन पाटील यांनी विजयाचा गुलाल लावला आहे.तसेच धुळे येथील मनहापालिका निवडणुकीत देखील भाजपचे दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याने पक्षाच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग क्रमांक 6 ब मधून जोत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच विजयी सुरुवात केली आहे. मतदानाच्या आधीच भाजपने विजयाचा चौकार ठोकला असून राज्यातील 3 महापालिकांमध्ये मिळून भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. भाजप उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे आणि रंजना पेणकर बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे.
रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पनवेल महापालिका आणि विदर्भातील धुळे (dhule) महापालिकेतही भाजपच्या प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने 3, पनवेलमध्ये 1 आणि आता धुळे मनपात दोन उमेदवार विजयी झाले आहे. पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक- 18 ( ब) मधून हि निवड झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकsत भारतीय जनता पक्षाने विजयाचं खातं काल उघडलं होतं, आज भाजपचा तिसरा विजय झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच्या उमेदवाररांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला अजून 15 दिवस बाकी आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 ला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता.प्रत्येक पक्षाकडून अर्ज मिळालेल्या उमेदवारांनी काल निवडणुकीसाठी अर्ज भरला, मात्र काहींनी एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली. काही जण नाराज झाले, तर काही थेट दुसऱ्या पक्षाचीही वाट धरली. काल दिवसभरात एकूणच भावी उमेदवारांसाठी "कही खुशी, कही गम " असेच वातावरण राहिले.
.jpg)

Post a Comment
0 Comments