Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण-डोंबिवलीत भाजपाला खिंडार.मनसेचं इंजिन सुस्साट

कल्याण-डोंबिवलीत भाजपाला खिंडार....माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि  माजी नगरसेविका मनिषा धात्रक.यांच्या सह त्यांची कन्या पूजा धात्रक यांना मनसेकडून उमेदवारी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत, यात मनसे 49 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 73 जागांवर लढणार आहे. 

              ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्याच पक्षाचे उमेदवार, कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान एबी फॉर्म वाटपावरून महायुतीमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. काही इच्छुकांनी तर थेट मनसेकडूनच एबी फॉर्म आणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काही ठिकाणी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्याने एकच खळबळ माजली आहे.

भाजपच्या पती-पत्नी-मुलीला मनसेची उमेदवारी

मनसेने शेवटच्या क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली, या यादीमध्ये भाजप-शिवसेनेच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छुकांना एबी फॉर्म दिले. या यादीमधील सगळ्यात महत्त्वाचे नाव म्हणजे भाजपचे माजी दिग्गज नगरसेवक शैलेश धात्रक आणि दिग्गज माजी नगरसेविका मनिषा धात्रक. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने धात्रक दाम्पत्याने मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढच नाही तर मनसेने धात्रक दाम्पत्याची मुलगी पूजा धात्रक यांनाही उमेदवारी दिली आहे. धात्रक दाम्पत्य हे दोन टर्म भाजपचे नगरसेवक राहिले आहेत.

मनसेची 49 उमेदवारांची यादी

अ.क्र.उमेदवाराचे नावप्रभाग क्रमांक
1सौ. पुजा दिपेश फुलवडे१ ब
2श्री. सचिन मनोहर शिंदे१ ड
3श्री. सुजीत आनंद जाधव२ अ
4श्री. उल्हास महादेव भोईर२ ड
5सौ. ज्योती आभाळे३ अ
6श्री. भूषण जाधव३ ड
7श्री. पवन नारायण भोसले५ अ
8सौ. रेखा उल्हास भोईर५ क
9श्री. गणेश लांडगे७ ड
10सौ. नयना प्रकाश भोईर७ अ
11सौ. उर्मिला तांबे९ क
12सौ. सोनल कपिल पवार९ ब
13श्री. अनिकेत उदय गायकवाड११ क
14विद्या योगेश गव्हाणे११ ब
15श्री. प्रभाकर वामन गायकवाड१५ क
16सौ. शितल महेश भंडारी१५ ब
17श्री. आनंता चंदर गायकवाड१५ ड
18सौ. स्नेहा सुनिल राणे१६ क
19श्री. सुनिल गणपत राणे१६ ड
20सौ. करुणा मिलिंद झाल्टे१८ ब
21श्री. महेंद्र पुंजा कुंदे१८ क
22काजल जयंता पाटील१९ ब
23श्री. जयंता दत्तू पाटील१९ ड
24श्री. प्रल्हाद परशुराम म्हात्रे२१ अ
25ॲड. वेदांगी प्रल्हाद म्हात्रे२१ ब
26सौ. आशा प्रेमराज पाटील२१ क
27श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील२२ अ
28सौ. रसिका संदेश पाटील२२ ब
29श्री. कदम गजानन भोईर२२ ड
30सौ. निलम हेमंत दाभोळकर२४ क
31श्री. अश्विन ब्रम्हा पाटील२४ ड
32श्री. शैलेश रमेशचंद्र धात्रक२५ अ
33सौ. मनिषा शैलेश धात्रक२५ ब
34पुजा शैलेश धात्रक२५ क
35श्री. प्रतिक पोपटलाल मारु२६ क
36सुवर्णा संजय पाटील२७ अ
37सौ. लिना अमोल पाटील२७ ब
38ॲड. मनोज प्रकाश घरत२७ ड
39श्री. समीर रोहिदास भोर२८ ड
40श्री. विशाल बढे२९ क
41ॲड. रसिका महेश कोस्तेकर२९ ब
42सौ. वैशाली योगेश पाटील३० अ
43सौ. वैशाली योगेश पाटील३० ब
44श्री. योगेश रोहिदास पाटील३० क
45श्री. योगेश रोहिदास पाटील३० ड
46श्री. तकदीर काळण३१ अ
47सौ. ज्योती रक्षित गायकर३१ ब
48सौ. योगिता तकदीर काळण३१ क
49श्री. निवृत्ती चंद्रकांत पाटील३१ ड


Post a Comment

0 Comments