ब्लॅक अँड व्हाईट विशेष
नमस्कार...दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी १८ महिने लपून राहिलेल्या एना फ्रॅंक च्या कुटुंबात तिच्या वडिलांनी एका युनिव्हर्सिटीमधून आपल्या मुलींसाठी पुस्तके मागवली होती. जिथे एक एक क्षण जगण्याचं , एक एक श्वास घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही अशा वातावरणातसुद्धा पुस्तकांची सोबत… हे मला गेले कित्येक वर्ष स्वस्त बसू देईना.
प्रत्येकाच्या हातात पुस्तक असायला हवं, साहित्याने समृद्ध जीवन जगत असलेलं माझं गाव…असं स्वप्न उराशी घेऊन माय मातीची वाटचाल सुरू झाली. मनात फक्त तळमळ…
स्वतःजवळ कुठलेही ज्ञान नाही, कुठल्या ज्ञानाचा वारसा नाही, अगदी वेळेपणाचा कळस……
अस जीवाचं रान करणारा हा प्रवास. पण म्हणतात ना…
पूरी सिद्धत से तुम जिसे चाहो, उसे तुमसे मिलाने के लिए पूरी कायनात भी जुड़ जाती है…
अगदी तसंच जणू! मला शिकवण्यासाठी सारी सृष्टी कामाला लागली. वेळोवेळी असंख्य नात्यांच्या रूपात उभी राहिली. असंख्य लोकांचे प्रेम, आपुलकी मिळाली…
आणि जिथे कुठे शिकायला मिळेल, ते शिकण्याची भूक आज मला लायब्ररी एज्युकेटरपर्यंत घेऊन आली.
गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू झालेला कोर्स…
तीन कॉन्टॅक्ट पीरियड, असाइनमेंट्स आणि फील्ड प्रोजेक्ट… असं भरपूर बौद्धिक खाद्य. डेडलाईन सगळं पार करत अखेर हा आनंदाचा क्षण आला. आनंदासोबत दुःखही आलंच. जेवढे प्रेमळ, तेवढेच आपल्या कामाकडे सूक्ष्मपणे बघण्याची दृष्टी देणारे आणि असंख्य प्रश्न खुले करून सतत त्या प्रक्रियेमध्ये राहायला शिकवणारे फॅसिलिटेटर्स आणि भारतभरातून तळागाळातील प्रत्येक मुलापर्यंत पुस्तक पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे सहकारी… यांच्यापासून निरोप घ्यायचा क्षण.
वरवर बघता हा निरोपाचा क्षण पूर्णविराम……मात्र क्षणात जाणीव होते… हा पूर्णविराम नसून नवीन आणि मोठ्या कामाची सुरुवात आहे.....तरीही आनंद आणि वियोग… या दोन्ही भावना……!
सौ. प्रभावती पाटील, ..संस्थापक, माय माती फाउंडेशन
.jpg)


Post a Comment
0 Comments