Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विकासकामे व महिला कल्याण यावर  विशेष भर...

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली पश्चिमेत पॅनल क्रमांक २२ मधून शिवसेना शिंदे गटाचे विकास म्हात्रे, त्यांची पत्नी, बाळा म्हात्रे, कविता म्हात्रे, संदेश पाटील पालिका निवडणूक रिंगणात आहेत.त्याच अनुषंगाने डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्ला चढवला. विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व उबाठा व कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास कामे, लाडकी बहीण योजना, आगामी निवडणुका, पक्ष संघटनात्मक मजबुती आणि विरोधकांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, आपले खासदार डॉक्टर आहेत पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो,असा स्पष्ट टोला त्यांनी महाविकास आघाडीला मारला.

आपणास महाविकास आघाडीला येथून पळवून लावायचे आहे आणि पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावयाचा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या विकास म्हात्रे यांचा उपमुख्यमंत्र्यांनी शेर म्हणून उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.





उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका करत शिंदे म्हणाले, तुम्ही म्हणता उपमुख्यमंत्री पद घटना बाह्य आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही घटना बाह्य काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की, मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री त्यांची पोटदुखी थांबतच नाही. बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखाना काढला तरीही त्यांना आराम मिळत नाही. आता तुम्हीच त्यांना जमालगोटा द्या. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तिला पकडून ठेवली आणि बाकी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे.असे ही ते म्हणाले .




पत्रकारांनी उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडी कुठे आहे? असा प्रश्न विचारल्यावर, घरी बसली आहे, असा तिखट टोला शिंदेंनी लगावला. याशिवाय त्यापुढे ते म्हणाले, डोंबिवली-कल्याण परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार असून, विकास म्हात्रे यांच्या पॅनलमुळे स्थानिक स्तरावर विकासाच्या कामांना नवी गती मिळेल. शिंदे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आगामी निवडणुकांना डोंबिवलीतूनच वातावरण तापवले. त्यांच्या या भाषणाने कार्यक्रमस्थळी उपस्थित शिवसैनिकांत उत्साह निर्माण झाला.

डोंबिवलीतील या कार्यक्रमातून शिंदे यांनी विकास, संघटन, महिला कल्याण आणि विरोधकांवरील प्रहार अशा सर्व आघाड्यांवरून आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय वातावरण तापवले. तसेच याच कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की,महायुतीचा महापौर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर कसा बसेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती एकत्र राहिली पाहिजे आणि निवडणुका महायुतीनेच लढल्या पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

Post a Comment

0 Comments