ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली हे खवय्यांसाठीचे शहर म्हणून ओळखले जाते.विविध जाती धर्माचे लोकं इथे आनंदाने राहतात.त्याचप्रमाणे देशातील अनेक भागांतील खाद्य संस्कृती इथे जोपासली जात आहे.सुशिक्षीत नागरिकांचे शहर, टीव्ही,सिनेमा कलाकारांचे शहर,साहित्यिकांचे शहर अशी ख्याती असलेल्या शहरात खाद्य संस्कृतीही तितकीच विविधतेने नटलेली आहे.खवय्यांचे लाड पुरवण्या साठी ह्या शहरात अनेक प्रकारचे ठिकाणं आहेत.त्यातच आता नवीन भर पडली ती सीफुड खाणाऱ्यांसाठी कोकणातील अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी मिळण्याचे ठिकाण म्हणजे मालवण तडका.
कोकणातील खाद्यसंस्कृतीचा अस्सल मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी स्वाद डोंबिवलीकरांसाठी घेऊन येणाऱ्या ‘मालवण तडका’ या नव्या हॉटेलचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. पारंपरिक मालवणी पाककृती, घरगुती मसाल्यांचा खास तडका आणि ताज्या समुद्री मासळीचे पदार्थ यांची रेलचेल हे या हॉटेलचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
‘मालवण तडका’ या हॉटेलमध्ये मच्छी थाळी, कोलंबी, बांगडा, सुरमई, पापलेट यांसारखे विविध समुद्री पदार्थ, तसेच सुक्या-ओल्या भाज्या, भाकरी-भाजी आणि खास मालवणी पद्धतीची आमटी यांचा समावेश असलेला समृद्ध मेन्यू उपलब्ध आहे. या शिवाय ग्राहकांच्या पसंतीनुसार चायनीज खाद्यपदार्थांसोबत कॉन्टिनेन्टल प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थही ग्राहकांसाठी स्वतंत्र आणि रुचकर पर्याय येथे उपलब्ध आहेत.
स्वच्छ, प्रशस्त आणि सुसज्ज वातावरण, कोणातील पारंपरिक घराचा देखावा असलेले इंटेरियर आणि ग्राहकाभिमुख सेवा आणि वाजवी दर यामुळे ‘मालवण तडका’ हॉटेल अल्पावधीतच कल्याण-डोंबिवली परिसरातील खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मालवण तडका ह्या विशेष हॉटेलची सुरुवात 2008 मध्ये पनवेल कामोठे येथे झाली.आणि आता एकूण 17 हॉटेलची शृंखला वेगवेगळ्या शहरांत कार्यरत आहे.आणि यापुढे ही शृंखला वेगवेगळ्या राज्यातही सुरू करण्याचा मानस मालवण तडकाचे मालक चरण शेट्टी यांनी बोलून दाखवली.
"मालवण तडका या हॉटेलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती खवय्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे" हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले. अस्सल मालवणी चवीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी ‘मालवण तडका’ हॉटेलला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpg)






Post a Comment
0 Comments