Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने सौ. वसुधा नाईक सन्मानित

                            ब्लॅक अँड व्हाईट पुणे वार्ताहर

         लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिना निमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पद्मश्री मणीभाई  देसाई मानव सेवा ट्रस्ट उरळी कांचन तर्फे आयोजित भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार सौ. मेघाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.तसेच या सोहळ्याचे मुख्य आयोजक डॉ.रविंद्र भोळे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते हा सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, येरवडा, पुणे येथे  हा भव्य सोहळा संपन्न झाला याप्रसंगी प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.   

   याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 105 मान्यवरांना 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न 2025 ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

        याच वेळी वसुधा फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्ष सौ. वसुधा वैभव नाईक, पुणे यांनाही 'हिंदू रत्न पुरस्कार 2025' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना पत्रकारितेसाठी देण्यात आला आहे. तसे वसुधा नाईक या एक उपक्रमशील शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री, लेखिका आहेत. त्याचबरोबर त्या 'आम्ही मुंबईकर 'या सामाजिक वृत्तपत्राच्या उपसंपादिका आहेत. 'शिक्षक ध्येय' या साप्ताहिकाच्या देखील उपसंपादिका आहेत. तसेच 'बिनधास्त' बातमीपत्राच्या त्या पुणे प्रतिनिधी आहेत.' साहित्य सारथी 'या वृत्तपत्राच्या देखील त्या पुणे जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांच्या या पत्रकारितेच्या कार्या साठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

 या पुरस्काराच्या वेळी आम्ही मुंबईकर सामाजिक वृत्तपत्राचे संपादक श्री प्रमोद सूर्यवंशी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.  अनेक संस्थांचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक वृंद उपस्थित होते.

 वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा - पुणे मो. नं. 9823582116

Post a Comment

0 Comments