ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापत असून कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाला भाजपने जोरदार झटका दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते भाजपात प्रवेश केला आहे. त्यासोबतच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी आणि सामाजिक कार्यकर्ते केतन रोकडे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याण पूर्वेत हा प्रवेश सोहळा पार पडला. गावाचा विकास डोळ्यासमोर ठेऊन भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया विजय जोशी यांनी दिली.
गेले काही दिवस कल्याण लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर चांगल्या सहकाऱ्यांशीवय शक्य नाही. विजय जोशी यांच्या सारखे चांगले कार्यकर्ते आधी पासून मित्र म्हणून जोडलें आहे. मित्र म्हणून मी काय करू शकतो हे सर्व महाराष्ट्रला माहिती आहे. भाजप विजय जोशी यांच्या पाठी 200 टक्के उभी राहणार असल्याचे यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
आज आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे विजय जोशी, विकी जोशी, माजी नगरसेविका शीतल मंढारी, केतन रोकडे, स्नेहल रोकडे, प्रल्हाद शेळके यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परिवारात जाहीर प्रवेश करून संघटनेला नवी ऊर्जा आणि बळ दिले आहे.
या प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भा.ज.यू.मो. जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, रितेश खराटे, विकी तरे, हेमलता पावशे, इंदिरा तरे, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, विजय उपाध्याय, अमित गायकवाड, प्रज्वल खैरनार, यशोदा माळी, वंदना मोरे, राखी बारोद तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Post a Comment
0 Comments