ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अडिवळी-ढोकळी व पिसवली परिसरात असलेल्या चाळ व इमारती मध्ये अनाधिकृत पाणी लाईन असून या नागरिकांकडून पाणी माफिया अनधिकृतपणे पाणीपट्टी वसूल करत आहेत. त्यामुळे या अनधिकृत पाणी लाईन अधिकृत करून या नागरिकांकडून पालिकेनेच पाणी पट्टी वसूल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कल्याण ग्रामीण मंडळ 2 चे चिटणीस संदिप क्षीरसागर आणि महिला उपाध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी उपायुक्त कांचन गायकवाड यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
गेल्या १० वर्षों पासून अडिवळी-ढोकळी व पिसवली मधील हजारो चाळी व कमीत कमी ५०० किंवा त्याहुन अधिक इमारती मध्ये पाण्याच्या पाण्याचे अनाधिकृत पाण्याच्या पाण्याची लाईन आहे. आणि त्या चाळीवर इमारतीच्या पाण्याचा महसूल (पाणी माफीया) दर महा वसूल करीत आहे. जेव्हा जेव्हा विकासाचे मुद्दे केडीएमसीकडे घेऊन येतो तेव्हा कल्याण डोबिंवली महानगर पालिकेकडे निधीची कमतरता असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत असतात.
अडिवळी-ढोकळी व पिसवली मधील चाळी व कमीत कमी ५०० किंवा त्याहुन अधिक इमारती मधील अनाधिकृत पाण्याची लाईन अधिकृत करण्यात यावी. त्यांच्या कडुन अधिकृतपणे (पाणी बिल) महसूल आकारण्यात यावा व या महसूलाच्या रक्कमेतून अडिवळी-ढोकळी व पिसवली परिसरातील रस्ते व गटारी कामाचा विकास करण्यात यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments