ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मतदार याद्यांतील मोठ्या गोंधळाचा मुद्दा भाजपा नंतर शिवसेना शिंदे गटाने देखील उचलला असून डोंबिवलीतील पॅनल २२ मध्ये मतदार याद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी करत निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला आहे.
संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून हिरावला जात असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयातही जाणार असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. त्याच प्रमाणे त्यांनी सांगितले ४,५०० मतांची अदलाबदल झालेली आहे जर निवडणूक आयोगाने ही दुरुस्ती केली नाही तर यामागे कोणती अदृश्य शक्ती असेल तर ती आम्ही शोधून काढू असा टोला विरोधकांना लगावला आहे.
प्रभाग २२ मधील तब्बल साडेचार हजार मतदारांची नावे जाणूनबुजून इतर प्रभागांत हलवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जर सीमावर्ती भागातील नावे हलली असती तर आम्ही मान्य केले असते, पण प्रभागाच्या मध्यभागातील मतदारांची नावेच दुसरीकडे कशी गेली? यात नक्कीच काहीतरी घोळ आहे असा आरोप म्हात्रे यांनी केला.
.jpg)



Post a Comment
0 Comments