ब्लॅक अँड व्हाईट : (विद्या कुलकर्णी)डोंबिवली
चित्रकला ही केवळ रंगांची खेळगिरी नसून मनातील भावना, विचार आणि कल्पनाशक्ती रंगांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची एक सर्जनशील कला आहे. या कलेतून सामाजिक संदेश आणि संस्कृतीचे दर्शन सहजपणे साकार करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती,कल्पकता,एकाग्रता आणि संयम या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने बुधवार १२नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्र नगर शाळेच्या प्रांगणात केले गेले . .
सुरुवातीस स्पर्धेचे आयोजक कै.अनंत नगरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माननीय सौ.माधवी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी स्पर्धा प्रमुख सौ. दीपा आपटे,संस्था सदस्य श्री.अरुण ऐतवडे,सौ. सरोज कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर,सौ.डुंबरे, विभाग प्रमुख ,शाळा प्रमुख, मा. मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री.अहिरे सर यांनी केले.या स्पर्धेत एकूण सहा गट १,सामील झाले होते.
स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व शाळेतील मिळून एकूण ४६० विद्यार्थी सहभागी झाले होते.स्पर्धेसाठीश्री.पवळे,श्री.भामरे,सौ.देवरे,श्री.पाटील,श्री.महाजन,श्री.म्हात्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . सौ.थोरात, सौ.नाईक यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. संस्थेच्या मान्यवर पदाधिकार्यांच्या हस्ते परीक्षकांचे स्वागत करण्यात आले. परीक्षक श्री.पवळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे कार्यवाह माननीय. श्री .फडके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.माजी शिक्षिका कुमुद डोके व शिरगोपीकर यांच्यातर्फे ही बक्षिसे देण्यात आली. सौ . गणवीर यांनी प्रायोजकांचा परिचय करून दिला. सौ. धनवडे यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. सौ .नलावडे यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या डोकेबाई,शिरगोपीकर बाई बेडसे बाई,विद्या कुलकर्णी बाई अशा माजी मुख्याध्यापिका,शिक्षिका ,तसेच आजी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले .आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं संपूर्ण नियोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्र नगर शाळेच्या सौ डुंबरे व दत्तनगर प्राथमिक च्या सौ मुणगेकर यांनी केले होते.
.jpg)






Post a Comment
0 Comments