Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण मध्ये बालकलाकारांनी सादर केला लोककलेचा महाजल्लोष

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून "जल्लोष लोककलेचा" हा लोककला महोत्सव १४ नोव्हेंबर  रोजी मराठा मंदिर हॉल कल्याण पश्चिम येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजितबालरंगभूमी परिषद कल्याण कल्याण शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा अध्यक्ष रविंद्र सावंतसांस्कृतिक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष हेमंत यादगिरे, परिक्षक प्राध्यापक विकास कोकाटेलोककला अभ्यासक प्राध्यापक महेश थोरात, कथ्थक गुरु स्मिता मोरे, बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या अध्यक्षा सुजाता डांगेप्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष संजय गावडे या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून "जल्लोष लोककलेचा" या भव्यदिव्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांनी प्रस्ताविक करताना स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. लोककलेचे महत्त्व पटवून देत स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करत स्पर्धेतील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

 

    एकल गायन या गटाने महोत्सवाची दणदणीत सुरुवात झाली. गोंधळ,जोगवाशेतकरी गीतकोळी नृत्य बघून पाहुणे प्रेक्षक भारावून गेले. सांघिक गायनसांघिक नृत्य,एकल वादनएकल गायनएकल नृत्य अशा एकापेक्षा एक लोककलांचे स्पर्धकांनी सादरीकरण केले. रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्तम प्रतिसाद देत कल्याण शाखेला उत्तम नियोजन करून बालकलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

एकल गायनएकल वादनएकल नृत्य सादरीकरण झाल्यानंतर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲड.निलम शिर्के-सामंत यांनी बालकलावंतांशी संवाद साधत लोककलेचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन जोपासणाऱ्या लोककलावंतांचे महत्त्व आणि सादरीकरण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली. तसेच बालरंभूमी परिषद बालकलावंतासाठी अनेक उपक्रम कश्याप्रकारे राबवत आहेत हे सांगत पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी बालकलावंतांनी मोठ्या प्रमाणात बालरंगभूमी परिषदेचे सभासदत्व घेऊन बालरंगभूमी परिषद नावाचे वटवृक्ष डेरेदार व भव्य करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. ॲड निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते एकल गायन,एकल वादन,एकल नृत्य या तिन्ही गटातील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

 

Post a Comment

0 Comments