एसटी आगारातील प्रवाशांचा जीव धोक्यात
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सार्वजनिक सुरक्षेची काळजी न घेता विठ्ठलवाडी बस आगारात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आगार व्यवस्थापकानेच सीएनजी पंपाशेजारीच फटाके फोडत, स्वतःच्या कारच्या बोनटवर केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बेफिकीर प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या घटना स्थळाजवळच सीएनजी पंप असल्याने कोणत्याही क्षणी मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, तरीही जबाबदार अधिकाऱ्याने नियम धाब्यावर बसवत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रवासी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सार्वजनिक स्थळी, विशेषतः सीएनजी पंपाजवळ अशा प्रकारचा उत्सव साजरा करणे अत्यंत धोकादायक असल्याने प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments