Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डंपीग, रस्त्यांची दुरावस्था, स्मशान भूमी प्रश्नी शत्रुघ्न भोईर यांचा आंदोलनाचा इशारा


उंबर्डे, हिऱ्याचापाडावाडेघर, कोळीवली,

गांधारी परिसरातील नागरिकांचे आरोग्य

धोक्यात

दिवाळीनंतर ग्रामस्थ आंदोलन करणार

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 उंबर्डे गाव परिसरात असलेल्या डंपीग ग्राउंडमधील कचऱ्याच्या घाणीचे त्रास होत असुन उंबर्डेगाव, हिऱ्याचा पाडा, कोळीवलीगांधारी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रभागात रस्त्यांची दुरावस्था असून काही गावांना स्मशानभूमी देखील नाही. याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून याबाबत लवकर काम सुरु करावे अन्यथा दिवाळी नंतर ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल कल्याण शहर अध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत माहिती देतांना शत्रुघ्न भोईर यांनी सांगितले की उंबर्डे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. तसेच बाहेरच्या बाजूला हि कचरा पडतो त्यामुळे भात शेतीवर परिणाम होतो. तसेच कचऱ्याचे काळे पाणी, केमिकल मिश्रीत पाणी जनावरे पितात त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला आहे. तर काही जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. संध्याकाळी खिडकी व दरवाजा बंद केल्याशिवाय घरातील जेवण करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आधारवाडी जेल रोड रस्ता हा डि पी प्रमाणे 24 मीटर असतांनाच फक्त सहा मीटर रुंदीचा बनविला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच वाडेघर ते सापाड गाव 15 व 18 मीटर रुंदीकरण गेले अनेक वर्षे रखडले आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे.  

कोळीवलीगांधारी, हिऱ्याचा पाडा परिसरात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी उघड्यावर करावी लागते. सापाड येथे स्मशानभूमी आहे परंतु दुरावस्था झाली आहे. लाईट नाही,पाणीसुविधा नाही टुव्हिलर गाडीची लाईट लावून अंत्यविधी करावा लागतो. महापालिकेत  गावे असुनही काही उपयोग नाही सोयी सुविधा पासून वंचित राहवे लागते. महापालिका प्रशासनाने या समस्यांची दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी अन्यथा दिवाळी नंतर ग्रामस्थ जन आंदोलन करतील असा इशारा भाजपाच्या शत्रुघ्न भोईर यांनी दिला आहे. 


Post a Comment

0 Comments