ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कल्याणच्या हॉली क्रॉस शाळेच्या मुलींनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन्ही गटात नेत्रदीपक यश मिळवत त्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
हॉली क्रॉस शाळेच्या मुलींनी १७ वर्षांखालील गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गटात तब्बल ३६ संघांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या लढतीत हॉली क्रॉसच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत शाळेसाठी १७ वर्षांनंतर सुवर्णक्षण प्राप्त केला आहे.
या दमदार विजयामुळे या विजयी संघाला आता मुंबई विभागीय स्पर्धेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. याचबरोबर १४ वर्षांखालील गटातही हॉली क्रॉस शाळेच्या मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले. या गटात १९ संघांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी हॉली क्रॉसच्या संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत द्वितीय क्रमांक (उपविजेतेपद) पटकावले.
मुलींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जेसिंथा यांनी संघाचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी खेळाडूंच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
क्रीडा शिक्षक रविंद्र देसाई आणि खो-खो प्रशिक्षक भारत नाईकनवरे यांच्या प्रयत्नांमुळे आणि योग्य मार्गदर्शनाखालीच मुलींनी हे यश संपादन केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक होत आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments