ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत इराणी चोराच्या कल्याणच्या खडकपाडा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सलमान साजिद जाफरी उर्फ इराणी वय 28 वर्षे याचा शोध घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमलदार यांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या परवानगीने सपोनि विजय गायकवाड, पोलीस हवालदार संदीप भोईर, योगेश बुधकर, राजू लोखंडे, पोलीस शिपाई महेश बगाड यांनी या आरोपीला शिताफिने व सौम्यबळाचा वापर करून मुसक्या आवळत पनवेल शहर पोलीस ठाणे पोलीस पथकाच्या ताब्यात दिले आहे. हा आरोपीत चेन स्नाचिंग गुन्ह्यामध्ये भिवंडी शहर पोलीस ठाणे, निजामपूरा पोलीस ठाणे, सहार पोलीस ठाणे मुंबई व मुंबई शहरातील इतर पाच ते सहा पोलीस ठाणे येथे पाहिजे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
.jpg)
Post a Comment
0 Comments