Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतले दुर्गाडी देवीचे दर्शन

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार  रविंद्र चव्हाण यांनी भेट देत दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. दुर्गाडी देवी म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील एक प्रमुख शक्तीपीठ. सर्वांना सुख समाधानाचे आणि समृद्धीचे आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना यावेळी चव्हाण यांनी केली.  दुर्गा देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. तसेच नवी ऊर्जा मिळाली. असल्याचे त्यानी सांगितले.


या वेळी नवरात्रौत्सव समितीचे अध्यक्ष रवि पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी, माजी भाजपा आमदार नरेंद्र पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक सुनील वायले,वरूण पाटील, दया गायकवाड आदींसह स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments