ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये दिनांक २९/०९/२०२५ रोजी "माहिती अधिकार दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व, पारदर्शक व जबाबदार प्रशासन घडविण्यात त्याचे योगदान तसेच नागरिकांच्या हक्कांची जाणीव या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उपमुख्याधिकारी श्री उमेश राऊत, लेखाधिकारी श्री. प्रवीण वडगये, लेखापरीक्षण अधिकारी श्री. किरण तांबारे, शहर अभियंता श्री संजय कुंभार यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे शासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढल्याचे सांगितले. नागरिकांना माहितीचा हक्क मिळाल्यामुळे लोकशाही अधिक सक्षम झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती उपमुख्याधिकारी श्री. उमेश राऊत यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माहिती सहाय्यकांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास नगरसेवक, विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Post a Comment
0 Comments