Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लुक अँड लर्न सेमिनारचे यशस्वी आयोजन.मेकअप आणि साडी ड्रेसिंग प्रशिक्षण

         

                ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर

 इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली कडून महिलांसाठी विशेष मेकअप सेमिनार आयोजित करण्यात आला होता.ह्या सेमिनार साठी मेकअप आर्टिस्ट भूमिका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या महिला प्रशिक्षणार्थींना मेकअप शास्त्रातील बारकावे शिकविले  गेले.सदर प्रशिक्षणासाठी केवळ 299/सहभाग शुल्क आकारले गेले होते.

ह्या एकदिवसीय प्रशिक्षण सेमिनार मध्ये भूमिका गांधी यांनी महत्वाचे तीन प्रकारचे मेकअप कसे करावे? कोणती काळजी घ्यावी? प्रत्येक व्यक्तीची त्वचा ही वेगवेगळी असते,त्या नुसार कोणत्या तांत्रिक गोष्टी वापराव्या आणि कशाप्रकारे परिपूर्ण मेकअप करावा याबद्दल बारकावे समजून सांगितले.




ब्रायडल मेकअप, डेली वियर मेकअप, मॅच्युअर स्किन मेकअप, ह्या संबंधी विस्तृत माहिती देऊन ,सहावारी  ते नऊवारी साडीचे ड्रेसिंग प्रकार सविस्तरपणे प्रात्यक्षिक करून दाखवले.प्रशिक्षणार्थींना स्वतः सहभाग घ्यायला लावून त्यांचा आत्मविश्वास वाढवला.हसत खेळत  आनंदी वातावरणात ही सेमिनार पार पडले.

मेकअप आर्टिस्ट भूमिका गांधी ह्या आधी TCS सारख्या संस्थे मध्ये कार्यरत होत्या.पुढे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात बराच काळ काम केले.आणि सौंदर्य शास्त्राचा अभ्यास करून गेली सात वर्षे मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या कार्यरत आहेत.

 भूमिका गांधी यांच्या मते मेकअप ही गोष्ट आता केवळ सुंदर दिसण्यासाठीच आहे असे नाही तर,मेकअप मुळे प्रत्येक स्त्रीचा स्वतःचा आत्मविश्वास वाढू शकतो.

आता केवळ सेलिब्रिटी साठी नाहीतर सर्व सामान्य महिलांसाठी हे मेकअप शास्त्र गरजेचे झाले आहे.असे मत व्यक्त केले.

ह्या सेमिनार मध्ये प्रशिक्षणार्थीकडून जमा झालेली सहभाग शुल्काची रक्कम अनाथ आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यातून भूमिका गांधी यांची सामाजिक दायित्वाची उत्कट भावना दिसून आली.

Post a Comment

0 Comments