Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील वॉर्ड नंबर 19 मधील रवि गायकर यांच्या कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

 

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर

वॉर्ड नंबर 19 मधील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे नवीन कल्याण मंडल सरचिटणीस श्री रवि गायकर यांच्या कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम प्रसंगी श्री  रवि गायकर,आणि त्यांचे  कार्यकर्ते ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री.शरद चव्हाण,श्रीबद्रीनाथ साळवी, श्री उमेश सूर्यवंशी ,संदीप खंडागळे, श्री.सच्चिदानंद दुबे(उत्तर भारतीय मोर्चा उपाध्यक्ष,नवीन कल्याण मंडळ..आदी मंडळी उपस्थित होती.


ह्या प्रसंगी श्री रवि गायकर यांनी अभिवादनाच्या आपल्या भाषणातून पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनाविषयी आणि त्याच्या कार्याबद्दल  बोलताना सांगितले की, "पंडित दीनदयाळ उपाध्याय (जन्म : मथुरा, २५ सप्टेंबर इ.स. १९१६ मृत्यू - ११ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता." (भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.)

"पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला."

"११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे."

"पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादी धोरण आखले होते.आजच्या मोदी सरकारच्या अनेक योजनांच्या मागेही एकात्म मानवतावाद आहे. *पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बॅंक योजना, दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मुद्रा बॅंक योजना, मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे*. भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास ही घोषणाही एकात्मवादाच्या विचारातून आली. ६० वर्षांपूर्वी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही तंतोतंत लागू पडते. अखंड समाजाचा विचार करणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे. "असे विचार रवि गायकर यांनी आपल्या भाषणात मांडले.







Post a Comment

0 Comments