Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅली

         
                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
आज शनिवारी  सकाळी डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. औदुंबर कट्टा, सुदर्शननगर येथून या रॅलीस सुरवात झाली. या रॅली मध्ये ज्ञानमंदीर विद्या संकुल, के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि टिळकनगर कॉमर्स कॉलेज यांचे विद्यार्थी, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या महिला वर्ग आणि निवासी मधील रहिवाशी हे सर्व पाऊस पडत असतानाही उपस्थित होते.




          हवा प्रदूषण प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता या संदर्भात घोषणा या रॅली मध्ये देण्यात आल्या तर काही लक्षवेधी फलक विद्यार्थ्यांचा हातात होते. यामुळे जनतेत या बद्दल मोठी जनजागृती करण्यात आली. या रॅली करीता जनतेकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. एमआयडीसी निवासी मधील प्रमुख रस्त्यावरून फिरून ही रॅली ज्ञानमंदीर विद्यासंकुल येथे समाप्त झाली. 
            या रॅली मध्ये 150 विद्यार्थी आणि 75 रहिवाशांनी हजेरी लावली. सदर रॅलीचा समारोप प्रसंगी ज्ञानमंदीर शाळेचा मुख्याधपिका संगीता पाखले, पर्यावरण दक्षता मंचचे अनिल मोकल आणि रुपाली शाईवाले यांनी हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता याविषयी सर्वाना मार्गदर्शन केले.
         या रॅली मध्ये  पर्यावरण दक्षता मंच तर्फे रुपाली शाईवाले, उज्वला केतकर, अनिल मोकल, प्राची कुलकर्णी, सुदर्शननगर निवासी संघ तर्फे सुरेखा जोशी, विजय सावंत, चंद्रशेखर राईलकर, विवेक पाटील, स्मिता फाटक, मिलापनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन तर्फे वर्षा महाडिक, अरविंद टिकेकर, राजू नलावडे, माया परांजपे, डॉ मनोहर अकोले, अरुण जोशी, एव्हरग्रीन सायकल प्रेमीग्रुप तर्फे हर्षल सरोदे इत्यादीसह विद्यार्थी शिक्षक, रहिवाशी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments