Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या कचरा प्रक्रिया केंद्रात पडघ्याच्या कंपनीतील मांसाच्या सडलेल्या अवशेषांचा कचरा

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पडघा येथील "अल हलाल कंपनीतील" जनावरांच्या मांसाचे सडलेल्या अवशेषांचा कचरा कल्याण येथे अनधिकृतपणे आणून फेकला जात आहे. कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील ऋतू बिल्डिंगवेदांत हॉस्पिटल समोर एक बोलेरे पीकअप आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील ब प्रभाग क्षेत्राची कचऱ्याची गाडी घेऊन कंत्राटी वाहन चालक आणि इतर कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. पडघा येथून अल हलाल कंपनीतून  आलेल्या बोलरो गाडीतून रक्ताचे पाणी पडत होते आणि बोलेरो गाडीतील सडलेल्या मांसाच्या कचऱ्याच्या गोण्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीत टाकत होते.



हा प्रकार स्थानिकांनी नागरिकांनी पाहून विचारपूस केली असता अल हलाल या कपंनितीतून म्हणजेच पडघा येथून दररोज हि बोलेरो गाडी कल्याण गांधारी येथे येऊन महानगपलिकेच्या गाडीत रिकामी केली जाते. पालिकेचे कर्मचारी हे प्राण्यांच्या सडलेले मांसाचे तुकडे कल्याणमधील उंबर्डे आणि गणेश घाट डम्पिंग येथे फेकतात असे कळले. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे पदाधिकारी संजय कारभारी, शिवसेना ठाकरे गटाचे वंडार कारभारी, पोलीस पाटील वासुदेव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत साबंधीताना जाब विचारला.

या गाडीत गोमांस असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असता या गाडीची संपूर्ण तपासणी करण्यासाठी उंबर्डे डंपिंग येथे रिकामी करण्यात आली व तपासणी केल्यानंतर पुन्हा या गाडीतील सडलेल्या मांसाच्या कचऱ्याच्या गोण्या पुन्हा गाडीत भरून पोलिसांनी पुढील तपासासाठी हि गाडी ताब्यात घेतली. पडघ्याच्या या गाडीतील चालकाच्या संपर्कात नगरपालिकेतील कचऱ्याच्या गाडीचे चालक वीरेंद्र प्रजापती आणि ब प्रभाग क्षेत्रातील संबंधित विभागातील काही अधिकारी संपर्कात असल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा  पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे.

       तर केडीएमसीच्या या कचरा प्रक्रिया केंद्राला स्थानिकांचा आधीपासूनच विरोध होता. असे असतांना केडीएमसी हद्दी व्यतिरिक्त बाहेरील कंपन्यांचा कचरा याठिकाणी आणून टाकत असल्याने स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली आहे. 


Post a Comment

0 Comments