ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपकडून ठिक ठिकाणी सेवा पंधरवडा अंतर्गत आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने कल्याणातील खडकपाडा राधानगर येथील माजी नगरसेविका सौ.साधना गायकर आणि भाजपा कल्याण शहर सरचिटणीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.प्रभागातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने रक्तदान केले.देशप्रेम भावनेने सर्व नागरिकांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला.श्री रवि गायकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबीर घेऊन प्रभागातील नागरिकांच्या प्रति आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
ह्या प्रसंगी रवी गायकर म्हणाले की,आपल्या देशाचे सर्वात जास्त लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत विविध आरोग्य सेवा कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.प्रभागातील अनेक भागात स्वच्छता उपक्रम राबविला आहे.त्याच अनुषंगाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.येत्या दिवसांत नेते चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर परिसरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर राबवून कल्याण शहर मोतीबिंदू मुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे.त्यानुसार आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कामाला लागलो आहोत.आणि ते संकल्प आम्ही पूर्ण करणारच,असा निश्चय बोलून दाखवला.रवि गायकर आणि सौ.साधना गायकर यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते ह्या उपक्रमात सामील झाले होते. हे शिबिर यशस्वी होण्या करिता पुढील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.
श्री. स्वप्नील काटे,श्री. अर्जुन भोईर, श्री संतोष भोईर,श्री. भगवान म्हात्रे, श्री आत्माराम जोशी. श्री रवि गायकर ,सौ. साधना गायकर, सौ. भावना मनराजा,श्री. सुनिल चव्हाण,श्री. प्रविण देशपांडे,श्री. नरेंद्र महाजन,श्री. सनिश त्रिपाठी, श्री. सच्चितानंद दुबे, श्री. सुभाष वाणी, श्री. संदिप खंडागळे,श्री. एलेन फ्रांन्सिस,सौ. पूजा खंडागळे, श्री. नमिष अरोरा,श्री. क्रिश अरोरा,श्री. उमेश सूर्यवंशी,श्री. राकेश मनराजा, श्री. राजेश लिंबाचिया, श्री. माथुर ,श्री. बद्रिनाथ साळवी, श्री. विवेक सिंग, श्री. राजेश सिंग, श्री. स्वप्नील थोरात,तसेच इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी केले
.jpg)









Post a Comment
0 Comments