ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शहरातील ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले दुर्गाडी येथे गेली पन्नास वर्षोपासून किल्ले दुर्गाडी उत्सव समिती आणि शिवसेनेच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजारा केला जातो. पाच लाखहून अधिक भक्तगण यानिमित्ताने दर्शनचा लाभ घेतात. या उत्सवानिमित्त व्यसनाधितेकडे जाणाऱ्या तरूणाईला परावृत्त करण्यासाठी संदेश देण्याचे काम केले जात असल्याची माहिती किल्ले दुर्गाडी येथे शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवि पाटील यांनी दिली. नवरात्र उत्सवाच्या तयारीचा आढावा पाटील यांनी घेतला यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. गणेशोत्सवा दरम्यान देखील रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजवले गेले नाहीत. आता नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. नवरात्र उत्सव सुरू होण्याआधी रस्त्यावरील खड्डे बुजवले पाहिजेत, नाहीतर आम्ही अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यात टाकू असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक सुनील वायले, गणेश जाधव, सुनील खारूक, प्रतिक पेणकर, शिवसेना शहर संघटक नेत्रा उगले यासंह महिला वर्ग उपस्थित होता.
Post a Comment
0 Comments