ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली सुतिका गृहात नवजात बालिकेचा मुत्यु झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकाकडून झाल्याने वसंत व्हली सुतिका गृहाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याने केडीएमसी आरोग्य विभाग वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात राहणाऱ्या अजरूद्दीन सोबराती मनसुरी यांची पत्नी तसलीमा मनसुरी ही नऊ महिन्याची गरोदर होती. तीला प्रसुतीसाठी शनिवारी पाहाटे 4 वा.सुमारास वसंत व्हली येथील केडीएमसीच्या सुतिका गृहात नेण्यात आले. सकाळी 8.48 वा.सुमारास सुमारास डिलीव्हरी होवुन मुलगी झाली. एक दिवसाआधी तसलीमा खातून नावाच्या महिलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतिगृहामध्ये महिलेची सकाळी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसूती नंतर त्यांना एक मुलगी झाली. बाळाला काही कोप्लिकेशन असल्याने बाळाला डॉक्टरांनी ऑक्सिजन वर ठेवण्याचा सल्ला देत त्या बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले.
पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल मध्ये मोठा गोंधळ घातला व बाळाचा मृत्यू हा केडीएमसीच्या रुग्णालय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्याच बरोबर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच बरोबर केडीएमसी प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केला असता. बाळाचा पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना कल्याण ग्रामीण आरोग्य विभाग तालुका प्रमुख अमित कोळेकर यांनी देखील करदाते नागरिकांच्या आरोग्य सुविधा प्रश्नी प्रशासन हतबल का, असा निष्काळजीपणा होत असेल तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यानिमित्ताने केली आहे.
केडीएमसी मुख्य वैघकीय आधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांनी सांगितले की, वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे कारण समजेल त्यानंतर त्याअंती योग्य असल्यास कारवाई बाबात कारवाई होईल. वसंत व्हली सुतिका गृहात बाळासाठी अतिदक्षता विभाग नसून शास्त्रीनगर रूग्णालय येथे बाळासाठी अतिदक्षता विभाग असल्याचे सांगितले. या घटनेतील आरोपामुळे आरोग्य विभागाचा सावाळा गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला असून, मनपा रूग्णालयातील तज्ञ डाँक्टर, सोयी सुविधा प्रश्न ऐरणीवर आला असून वसंत व्हाँली सुतिका गृहात बाळासाठी तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा अशी मागणी जोर धरू पाहत आहे.
Post a Comment
0 Comments