ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन दयाव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने १६२ वर्षे अविरत वाचन परंपरा जपणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याण या ऐतिहासिक वाचनालयाला सन २३-२४ चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनी म्हणजेच जागतिक ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उच्चतंत्र शिक्षण विभागाचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिक्षण विभागाचे मुख्यसचिव गोपालाचार्य रेड्डी यांच्याहस्ते वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी व सरचिटणीस भिकू बारस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम १लाख रु.,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. प्रसंगी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र ग्रंथालय संघ अध्यक्ष गजानन पोटेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालय क्षेत्रातील सर्व स्तरातून वाचनालयाचे कौतुक करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments