Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ऑक्टोबर मध्ये पूर्ण होणार कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मार्गी लागत असलेल्या कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण रेल्वे स्थानकाला नवा आयाम देणारा सुमारे ८१३ कोटींचा हा यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प सध्या जलद गतीने सुरू असूनया प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. तर येत्या दीड वर्षात उर्वरित काम देखील मार्गी लागणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे साकारत असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण स्थानकाचे रूप पालटणार आहे.


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदारसंघात सातत्याने पायाभूत सुविधा उभारणीवर भर दिला आहे. कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण रेल्वे स्थानकाला नवा आयाम देणारा सुमारे ८१३ कोटींचा हा  यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प सध्या जलद गतीने सुरू असूनया प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. तर येत्या दीड वर्षात उर्वरित काम देखील मार्गी लागणार आहे.  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे साकारत असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण स्थानकाचे रूप पालटणार आहे.

कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत सध्या कल्याण पूर्व भागात नवीन ट्रॅक टाकणेफूटओव्हर ब्रिजवर कव्हरिंग शेडडेकचे गर्डर आणि जुन्या गुड्स यार्ड ट्रॅक्स काढून नवीन टाकण्याची कामे सुरू आहेत. या प्रकल्पात गुड्स यार्डसाठी वेगळ्या रिसेप्शन आणि डिस्पॅच लाइनतीन नवीन फूटओव्हर ब्रिजफलाटांवर मोठ्या स्लॅबचे बांधकामएलिवेटेड डेक सेंटिस प्रकल्पाचाही समावेश आहे. हे काम येत्या दीड वर्षात पूर्णत्वास जाणार आहे.

या प्रकल्पामुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्यांच्या मार्गिका स्वतंत्र होऊन गाड्यांची गती आणि वेळेची अचूकता वाढेल.  प्लॅटफॉर्मची संख्या वाढून प्रवाशांची गर्दी कमी होईल. रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होईल. विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक सुविधा मिळतील. बोगद्यातून होणारा पायी प्रवास बंद होईल. प्रवाशांना थेट होम प्लॅटफॉर्मपर्यंत वाहन घेऊन जाण्याची सुविधा मिळेल.


Tags

Post a Comment

0 Comments